
राह फाउंडेशन आणि एंजल वन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता डिजिटल आणि आर्थिक साक्षरता करिता मोबाईलचे वाटप…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी –
रामदास गाडर
जव्हार – दिनांक – 15 नोव्हेंबर रोजी राह फाउंडेशन एंजल वन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राह फाउंडेशनच्या जव्हार येथील कार्यालयात आदिवासी महिलांकरता मोबाईलचे वाटप करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खेडेगावातील गरीब महिलांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने हे मोबाईल वाटप करण्यात आले आहे. तसेच या अगोदर सुद्धा राह फाउंडेशनच्या वतीने शिलाई मशीन,घरघंटी,किराणा दुकान यांच्यासाठी मदत केली होती. आणि आता किराणा दुकानासाठी हे मोबाईल वाटप करण्यात आले त्यामुळे यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना तरळून गेली होती. या मोबाईल वाटपाच्या कार्यक्रमात यावेळी संस्थेच्या संस्थापिका सौ. सारिका कुलकर्णी,सौ. सानिया रिसबोड आणि सुप्रसिद्ध गायिका मानसी केळकर ( तांबे ) तसेच श्री आहेर सर,झोले सर तसेच दशरथ मोकाशी सर उपस्थित होते.
Total Users : 10829