
पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर… बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाला पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष…
जोहार इंडिया 24 न्यूज पालघर प्रतिनिधी – रामदास गाडर
महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खाली खेचत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर आपलं नाव कोरून कोरले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाशजी निकम यांची जिल्हा परिषद अध्यक्ष तर भाजपचे श्री.पंकज कोरे यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या सत्ता बदलाच्या विजयामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला राज्यामध्ये पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.
नवनिर्वाचित पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष – श्री.प्रकाशजी निकम आणि उपाध्यक्ष – श्री. पंकज कोरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Total Users : 10828