
यारी दोस्ती ग्रुप कडून गरजू कुटुंबाला मदत….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी, वाडा तालुक्यातील पाली गावठणपाडा पोशेरी श्री. सुरेश थापड यांच्या घराला रात्री आग लागून संपूर्ण घर जळाले आहे, त्यात त्यांच्या घरातील सर्व वस्तू जळून नष्ट झाल्या. त्यामुळे या कुटुंबावर खूपच मोठे संकट कोसळले. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा काहीच राहिले नाही. हे सर्व यारी दोस्ती ग्रुप ला कळताच त्वरित ग्रुप कडून मदत करण्याचे ठरविले.
आज त्यांच्या गावात जावून त्यांना ग्रुप कडून किराणा कीट, चादर आणि स्वेटर देण्यात आले. या छोट्याश्या मदतीतून त्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. या मदती साठी त्यांनी यारी दोस्ती ग्रुप चे खूप खूप आभार मानले.
ही मदत यारी दोस्ती ग्रुप ने ग्रुप मधील सदस्यांनी १००, २०० रुपये जमा करून त्या निधीतून एक आपले सामाजिक कर्तव्य म्हणून मदत केली आहे.

Total Users : 10829