
सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पुरुष दिन मोठया उत्साहात साजरा…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )सोमनाथ सातपुते
पालघर ; या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातील महिला प्रा. सहकारी भगिनिनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे सर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.गोपीनाथ नागरगोजे सर यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली.यानंतर सर्वच पुरुष सहकार्यांना महिला सहकारी भगिनी यांच्या मार्फत विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे विविध गमतीदार खेळाचे आयोजन यामध्ये केलेले होते.सदर कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा.अरुण सुरथी सर, प्रा प्रीती फणसेकर मॅडम, सांस्कृतिक मंडळाच्या कार्याध्यक्षा प्रा.पवार मॅडम, डॉ येवले सर ,घुगे सर ,गायकवाड सर ,कुलकर्णी मॅडम आदी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नेहा म्हात्रे यांनी केले तर आभार प्रा अनिता लोहार यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा पिंकी पांचाळ मॅडम, प्रा सुप्रिया राऊत, प्रा नंदिनी दांडेकर यांनी विशेष मेहनत घेतली आणि सर्वच प्राध्यापक महिला सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे सर यांनी महिला प्राध्यापकांचे कौतुक करून आभार मानले

Total Users : 10829