
निपुण महाराष्ट्र अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील वाडी वस्तीत माता पालक गटांचा उत्कृष्ट सहभाग….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )-दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड;माननीय श्री. हनुमंतरावजी दोडके गटविकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड व माननीय श्री बापू भिकू शिणगारे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती विक्रमगड यांच्या मार्गदर्शनाने व पंचायत समिति शालेय शिक्षण विभाग आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांचा सयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत बाल दिनाच्या अवचित्य साधून विक्रमगड तालुक्यातील वाडी वस्तीत निपुण उत्सवाला शुभारंभ करण्यात आला आहे. हा उत्सव साजरा करण्याकरीता विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक,शाळा समिति प्रत्येकी वाडी वस्तीवरील माता गटांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून मुलांचा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी होत असलेल्या प्रगती यामध्ये येणाऱ्या अनुभव यांची माहिती शिक्षकाकडून घेतली जाणार आहेत. बाल दिनाच्या निमित्ताने साक्षरता व संख्याज्ञान भक्कम करण्यासाठी निपुण कार्यक्रम विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळेमध्ये उत्तमरीत्या राबवल्या जात आहे. पंचायत समिती अंतर्गत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग मार्फत माता गटांना भेटी देण्यात येत आहे. यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचविला जात आहे. माता गट पालकांना या अभियानाचा हेतू माता पालकांच्या भूमिका तसेच दैनंदिन व्हिडिओ संदर्भात काय नियोजन करावे व आपल्या पाल्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदर उपक्रमाचा कसा उपयोग करून घ्यावा यासंदर्भात निपुण मातांना श्री.बापू भिकू शिंगारे गटशिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. निपुण महाराष्ट्राच्या माध्यमातून पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत समुदाय सहभाग स्थानिक पातळीवरील कार्यरत सामाजिक संस्था व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होण्यास मदत होत आहे. याकरिता पंचायत समिती विक्रमगड येथील माता पालक गटाचे तालुका नोडल अधिकारी श्री.गिरीष सांबरे, हृषिता कोरे मॅडम व प्रथम एज्युकेशन संस्थेचे प्रतिनिधि गुरु तिरणकर आदी सहकार्य कार्यरत आहे.


Total Users : 10829