
ग्राम शिक्षण केंद्राची उभारणी लावी वाचनाची गोडी...
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )-दीपक भोये विक्रमगड
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व सिरमॅक्सो यांच्या सयुक्त विद्यमाने गाव कुडण या ठिकाणी दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी गावामध्ये ग्राम शिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली. वावे भागातील सरपंच यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. ग्राम शिक्षण केंद्रासाठी गावातील माता पालक, गावातील सदस्य ,मुले तसेच प्रथमचे प्रतिनिधी हजर होते.या कार्यक्रमानिमित्ताने गावातील जमलेल्या सर्वांना सर्वप्रथम ग्राम शिक्षण केंद याची संकल्पना या विषयी मार्गदर्शन केले. सोबतच प्रथम च्या गावामध्ये चालू असलेल्या इतर उपक्रामांची देखील माहिती देण्यात आली.
ग्राम शिक्षण केंद्र गावामध्ये स्थापनेतून गावातील शैक्षणिक वातावरण टिकून राहावे, वाचनाची आवड निर्माण व्हावी, सर्वच घटक एका व्यासपीठावर येवून शिक्षणाविषयी, गावातील शैक्षणिक परिस्थितीवर विचारमंथन करावे, मुलांना, युवक वर्गाला अवांतर वाचनाची सवय लागावी, दैनंदिन जीवनातील घडामोडी यांची माहिती व्हावी; यासाठी गावाच्या सहकार्याने ग्राम शिक्षण केंद्र उभारणी करण्यात आली.
याविषयी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन बोईसर (पालघर) समन्वयक DRL लक्ष्मण हाडळ यांनी संकल्पना, स्वरूप आणि त्याची व्याप्ती याची पूर्ण माहिती दिली. गावामध्ये राबविण्यात येत असलेल्या इतर कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच कुडण गावातील सरपंच विजया म्हात्रे यांनी देखील पूर्ण जमलेल्यांना या उपक्रम खूपच लाभकारक आहे. यातून खऱ्या अर्थाने मुले आणि गावातील मातापालक युवक-युवती यादेखील खूप काही शिकू शकतात. आजची परिस्थितीवर देखील त्यांनी भर देत मातापालक यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील माता पालक, सदस्य, मुले आणि विशेष करून गावातील मान्यवर यामध्ये निकिता पाटील, ममता बालशी, मंगला पाटील, सुवर्णा तुंबडा, सरिता बालशी आणि मानशी बालशी व प्रथमचे प्रतिनिधी CIM मधुकर कुवरा, सुचिता बोदले, प्रणाली पडवळे, सचिन धोदडे, सोनल ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Total Users : 10829