ji24news

वाकडपाडा मुलांच्या वसतीगृहात नवीन ‘मित्राचे’ आगमन…

वाकडपाडा मुलांच्या वसतीगृहात नवीन ‘मित्राचे’ आगमन…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) सौरभ कामडी.

स्पार्क फाऊंडेशन-ठाणे तर्फे आज राजीव गांधी मुलांचे वसतिगृह वाकडपाडा येथे सौर ऊर्जेवर आधारीत गरम पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात आली.सूर्याचे एक नाव ‘मित्र’ असल्याचा संदर्भ घेऊन या यंत्रणेचे नामकरण ‘मित्र’ असे करण्यात आले आहे. मोखाडा पंचायत समिती उपसभापती श्री.प्रदीप माधव वाघ यांचे तर्फे सूर्याचे नमन व आवाहन करण्यात आहे.तर वसतीगृहातील सर्वात लहान विद्यार्थी धीरज सोमनाथ वारघडे याच्या हस्ते ‘मित्र’ चे उद्घाटन करण्यात आले. गरम पाण्याची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित सोय उपलब्ध झाल्याने मुलांनी ताशा वाजवून आनंद प्रकट केला. या प्रसंगी श्री.प्रदीप वाघ यांनी ऐन हिवाळ्याआधी मुलांची सोय झाल्याने समाधान व्यक्त केले व पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला.

यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री.पवार सर, स्पार्क संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.नितीन गणपत पिठोले, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री विठ्ठल गोडे पोलिस पाटील, श्री संजय वाघ माजी सरपंच, शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते..

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर