
यारी दोस्ती ग्रुप सदस्याचे गरजू मुली साठी रक्तदान……
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी
दिनांक २३ नोव्हेंबर रोजी तलासरी तालुक्यातील पाटकरपाडा येथील कु. निकीता लक्ष्मण वळवी (वय १४ वर्षे) या रुग्ण उपचारासाठी तलासरी येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती मात्र त्यांना उपचारासाठी रक्ताची नितांत आवश्यकता होती पण ; तात्काळ त्यांना आवश्यक रक्त गट उपलब्ध होत नव्हता. या करिता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून “यारी दोस्ती ग्रुप पालघर” या व्हॉट्सॲप ग्रुप वर मेसेज शेअर केला.
या मेसेज बघून यारी दोस्ती ग्रुप मधील सदस्य श्री. नितेश पागी (डहाणु -चरीकोटबी) हे रक्त द्यायला त्वरित तयार झाले. आज त्या पेशंट सोबत कोणतेही नाते नसताना माणुसकीचे नाते जपत रक्तदान केले.
या बद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी यारी दोस्ती ग्रुप चे आणि श्री. नितेश पागी या रक्तदात्याचे खूप खूप आभार मानले.
Total Users : 10829