ji24news

विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांचे बंधू बाळकृष्ण (पप्पू) भुसारा जिजाऊ संघटनेत प्रवेश केला.

विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांचे बंधू बाळकृष्ण (पप्पू) भुसारा जिजाऊ संघटनेत प्रवेश केला.

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

 पालघर जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, स्पर्धा परीक्षा आणि अनेक सामाजिक उपक्रम राबवत जिजाऊने आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. अशातच जिजाऊ संघटनेच्या झडपोली येथील कार्यालयात रविवारी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांचे बंधू बाळकृष्ण (पप्पू) भुसारा यांनी नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत जिजाऊ संघटनेत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचे पालघर जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र दोंदे यांनी जाहीर प्रवेश केला. बाळकृष्ण भुसाराच्या प्रवेशाने आमदार सुनील भुसारांना मोठा धक्का बसला आहे.
जिजाऊ संघटनेत प्रवेश करतेवेळी बाळकृष्ण यांनी सांगितले, की मोखाडा तालुक्यात आरोग्य, शिक्षण, रस्ते, रोजगार, महिलांच्या समस्या अशा अनेक समस्या आहेत. विक्रमगड विधानसभेला आमदार लाभला, पण समस्या कायम आहेत. कोणतही पद नसताना जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे या सर्व समस्या निःस्वार्थपणे सोडवत आहेत. या सेवेला साथ द्यावी या एकमेव उद्देशाने आपण जिजाऊ संघटनेत प्रवेश केला आहे; तर नीलेश सांबरे यांनी सांगितले, की जिजाऊ संघटनेमार्फत संपूर्ण विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू तालुक्यांच्या विकासासोबतच शिक्षण व आरोग्य सक्षम करण्याचा आमचा ध्यास आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर