
विषय-विक्रमगडच्या तहसील कार्यालयावर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीन दिवसीय मोर्चाची सांगत……
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड तहसील कार्यालयावर किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन दिवसापासून विविध मागण्यासाठी या आंदोलन करण्यात आले.
विविध मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलने सुरू होते
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते त्या मागण्या तातडीने पूर्तता करण्यात यावी, असा आग्रह त्यांनी केला. सर्व यंत्रणा जागी होऊन या आंदोलनाच्या ठिकाणी स्टॉल लावून महावितरणाचे विज बिल कमी करण्यास सुरुवात झाली. दारिद्र रेषेखालील जुने झालेले रेशन कार्ड बदलून नवीन देण्यात आले. प्रांत कार्यालयाकडून 100 ते 150 वनपट्टेधारकांना प्रमाणपत्र देण्यात आले. इतर मागण्यांची पूर्तता करण्यात आले. हे शासन आंदोलन केल्याशिवाय जागे होत नाही. यासाठी सर्व मुद्दे मार्ग लागावे. अशी मागणी करण्यात आली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाची ज्येष्ठ नेते राजा गहला, किरण गहला, टोलुराम चौधरी, आधी उपस्थित होते.

Total Users : 10829