ji24news

शिक्षक भारतीची शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यां समवेतच्या सहविचार सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय : शिक्षक आमदार कपिल पाटील …

शिक्षक भारतीची शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यां समवेतच्या सहविचार सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय : शिक्षक आमदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

    मुंबई ; आज इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालय दादर मुंबई येथे मुंबई व कोकण विभाग शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची सहविचार सभा शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

या सभेदरम्यान प्रथमतः इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखामधील संस्था, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
त्याचबरोबर ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील विविध प्रश्न व प्रलंबित प्रस्तावाबाबत सविस्तर विचार करून निर्णय करण्यात आले.
या सभेदरम्यान विविध प्रकरणी न्यायालयाने दिलेले निर्णय विचारात घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये सर्व प्रकरणी निकाली काढावीत याबाबत आमदार कपिल पाटील यांच्या अत्यंत आक्रमक व आग्रही सूचनेला चर्चेअंती मंजुरी देण्यात आली.
त्यानुसार येथे आठ दिवसांमध्ये सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील असे आश्वासन शिक्षण उपसंचालक यांनी देत सर्व अधिकाऱ्यांना याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना केल्या.
अनुकंपा योजनेअंतर्गत विविध ठिकाणचे सुमारे 250 हून अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याची बाब शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर यांनी व्यक्त करत येथे झालेल्या चर्चेबाबतचे इतिवृत्त लिहून त्याचा अंमलबजावणीचा अहवाल ही आम्हाला लेखी स्वरूपात प्राप्त व्हावा अशी आग्रही मागणी केली. चर्चेनंतर याला सर्वानुमते मंजुरी देत याबाबतचा अहवाल संघटनेला सादर करण्यात येईल अशी माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.
यानंतर मुंबईसह ठाणे,रायगड व पालघर या जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्याबाबत व प्रस्तावा बाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आले.
सभेमध्ये अग्रक्रमाने भूमिका मांडत असताना शिक्षण विभागाकडे सादर केलेले प्रस्ताव सुमारे दीड वर्ष वा दोन-दोन वर्ष प्रलंबित राहतात ही बाब अनाकलनीय आहे. खरे तर शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर झाल्यापासून आठ आठवड्यात निर्णय होण्याची आवश्यकता आहे. याबाबतच्या स्पष्ट सूचना शासन स्तरावरून असतानाही अधिकारी मात्र वेळेवर निर्णय घेत नाहीत याबद्दल खंत व्यक्त करत याबाबत प्राधान्य क्रमाने भूमिका घेऊन निर्णय व्हावेत अशी भूमिका कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी मांडली.
या सूचनेला उपस्थित अधिकारी यांचेकडून होकार देत लवकरात लवकर सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

सदर सभेदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांचे प्रलंबित प्रस्ताव, निर्वाह निधी खात्यामधून मिळणाऱ्या देय रकमास होणारा अक्षम्य विलंब याबाबत सविस्तर विचार करत निर्णय घेण्यात आले.
शेवटी संबंधित सर्व प्रलंबित समस्यांचे संकलन करून येत्या पंधरा दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपस्थित अधिकारी वर्गांच्या वतीने शिक्षक भारतीला व आमदार कपिल पाटील यांना दिले.
या सभेदरम्यान कार्याध्यक्ष सुभाष मोरे, सरचिटणीस जालिंदर सरोदे व प्रकाश शेळके,महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा संगीताताई पाटील, मुंबई विभागाच्या अध्यक्षा श्रीमती कल्पना शेंडे, जेष्ठ महिला पदाधिकारी श्रीमती राधिका महाकाळ, जुनिअर कॉलेज संघटनेचे प्रा ईश्वर आव्हाड, प्रा शरद गिरमकर, शिवाजी खैरमोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे यांचेसह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनाबाबत सविस्तर विचार करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी जुनियर कॉलेज विभागातील वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रस्तावांच्या बाबतचे मान्यता कॅम्प येथे सात आणि आठ डिसेंबरला आयोजित करत असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी सर्व उपस्थिताना दिली.
सदरचे घेतलेले निर्णय लवकरात लवकर संबंधितांपर्यंत पोहोचावेत यासाठी शिक्षण खात्याने प्राधान्यक्रमांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली त्याचबरोबर वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील संस्थाचालक वा काही मुख्याध्यापक जाणीवपूर्वक पाठवीत नाहीत. यावर तक्रार करण्यात आली असता याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व जिल्ह्यांतील शाळांना लेखी पत्र पाठवून सूचना देण्यात येईल असे आश्वासन शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिले.
सभेच्या शेवटी विविध प्रकारचे प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्यात यश मिळविल्याबद्दल उपस्थित शिक्षकांनी शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यासह विविध राज्य पदाधिकारी व शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सभे दरम्यान शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांनी बराच काळ कार्यरत राहून शिक्षकांसाठी तयार केलेल्या संकलन शिक्षकांसाठी या संग्रह पुस्तकाची सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत देऊन हार्दिक आभार मानण्यात आले.
सदरच्या संग्रहामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी अधिकारी वर्गाला मोठ्या प्रमाणात संदर्भ उपलब्ध होत राहणार आहेत याबद्दल उपस्थिती मनःपूर्वक आनंद व्यक्त केला.
         या सहविचार सभेला शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचेसह निरीक्षक श्रीमती पारधी,पालघरच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत, ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती दहितुले, मुंबईतील शिक्षण निरीक्षक श्री वनवे साहेब, सहाय्यक शिक्षण संचालक शेषराव बडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कारेकर, शिक्षण निरीक्षक श्री महाजन , श्री सावंत यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर