
केशव सृष्टी ग्रामविकास संस्थेतर्फे प्लास्टिक जनजागृती कार्यक्रम….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )- दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड;दिनांक ३० नोव्हेंबर रोजी बुधवार ला केशव सृष्टी ग्रामविकास योजने अंतर्गत विक्रमगड आठवडी बाजारामध्ये प्लास्टिक जनजागृति कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला उपस्थित विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री.गीते साहेब व पोलीस उपनिरीक्षक जगताप साहेब उपस्थित होते. कार्यक्रम विक्रमगड हायस्कूल विक्रमगड येथील अकरावी व बारावीचे विद्यार्थी आणि केशव सृष्टी ग्रामविकास योजना संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत हा कार्यक्रम विक्रमगड आठवडी बाजारामध्ये राबविण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी माहिती सांगण्यात आली व कचरा कसा संकलित करायचा आणि त्याचा विल्हेवाट कशा पद्धतीने लावायचा याची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन केशव सृष्टी ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते केंद्रप्रमुख दिलीप घाटाळ विस्तारक योगेश खांजोडे, सुरज डिग्रसे, हरपुडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Total Users : 10829