ji24news

देहरे ग्रामपंचायत हद्दीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करण्याची नागरिकांची मागणी..

देहरे ग्रामपंचायत हद्दीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करण्याची नागरिकांची मागणी.


जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )जव्हार -मनोज कामडी.

जव्हार तालुका हा ९९% आदिवासी बहुल तालुका असून या भागातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी गावात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे.त्याच प्रमाणे जव्हार तालूका हा आदिवासी बहुल तालूका असून निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे. या भागात महिला बचत गट, रोजगार हमी योजना,इतर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना इत्यादी माध्यमातून सध्या ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे व्यवसाय करून कमावलेला पेसा बचत करण्यासाठी बँकेत जाऊज आर्थिक व्यवहार करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात बँकांचे जाळे खूपच कमी असून यापूर्वी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत देहरे येथे अस्तित्वात होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर शाखा बंद केली असून या भागातील देहरे, दसकोड, सावरपाडा,साखरशेत ,दाभलोन,मेढा ,डुंगानी, मोर्चापाडा, भागडा ,ओझर ,पिंपळशेत,चांभारशेत, खरोडा इत्यादी गाव असून या सर्व गावातील नागरिक ३०ते ५०कमी अंतर पार करून जवळपास हजारो लोकसंख्या असलेले ग्रामीण भागातील नागरिकांना पैसे काढणे व ठेवण्यासाठी जव्हार शाखेत यावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकमेव असलेल्या जव्हार शाखेत नागरिकांची गर्दी होत असते. तसेच या भागातील नागरिकांना बँकेत व्यवहार करण्यासाठी पूर्ण दिवस जातो त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी आज देहरे गावचे नवनिर्वाचित युवा सरपंच जितेश हरिश्चंद्र भोये यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जव्हारचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडे लेखी तक्रार करून लवकरात लवकर देहरे येथे आपली पूर्वी असलेली शाखा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली आहे. सदर शाखा सुरू झाली तर या भागातील १०ते १२गावातील नागरिकांची होणार गैरसोय दूर होऊ शकते व त्याचा वेळ वाचू शकतो असे मत युवा सरपंच जितेश भोये यांनी व्यक्त केले आहे. तरी आमची मागणी लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी व आपली शाखा येथे पुन्हा सुरू करावी त्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आपल्याला सहकार्य केले जाईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्या शांता भोये ,प्रियांका वाघ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते
विश्वनाथ भोये ,संदिप भोये दुर्गादास महाले इ. उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर