ji24news

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यासाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन…

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यासाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये विक्रमगड.

पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्यासाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले असून याबाबतचे निवेदन संबंधित विभागास व मंत्रीमहोदयांना या अगोदरच दिलेले असून कोणताही तोडगा न निघाल्या मुळे अखेर आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे.
सन 2006 पासून ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम रोजगार सेवक पद शासनाने अस्तित्वात आणले. रोजगार हमी योजना कामाच्या. अंमलबजावणीसाठी ग्रामरोजगार सेवकांची भूमिका महत्वाची आहे. अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते रोजगार हमीची कामे सुरु करून हजेरी पत्रक पूर्णतः भरून मजुरी अदा करणे व इतर कामे ग्राम रोजगार सेवकांकडून करवून घेतली जातात. याचा मोबदला म्हणून ग्राम रोजगार सेवक यांना सव्वा दोन टक्के मानधन म्हणजेच मजुरांची मजुरी एक लाख रुपये शासन अदा करते. तेव्हा ग्राम रोजगार सेवकाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन मिळते. तसेच ग्रामपंचायत ते पंचायत समिती स्तरावर येण्या -जाण्यासाठी प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता देण्याची शासनाची तरतूद आहे. मात्र ते ही न दिले जात असल्यामुळे रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अल्प मानधनावर ग्रामपातळीवर विविध काम करून घेत आहे. शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे त्यांचे काम चालू आहे. शासन निर्णयानुसार रोजगार सेवकांच्या कामाची वेळ ही अर्धवेळ असताना शासन रोजगार सेवकांकडून पूर्णवेळ काम करून घेत असल्याची तक्रार निवेदनात केली आहे.
त्यांचप्रमाणे महात्मा गांधी रा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत अनुज्ञय 262 कामे करून हजारो मजूरांच्या हाताला काम देणारा व ग्रामीण भागातील रोजगारा साठी शहारा कडे होणाऱ्या स्तलांतर रोखण्यासाठी जबाबदार असणाऱ्या रोजगार सेवक आजमितीस सुविधांविना आपल्या संसाराचा गाडा चालविण्यास असमर्थ असल्याची खंत व्यक्त करीत रोजगारासाठी शहराकडे स्तलांतर होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मनरेगाचा मुख्य कणा असलेला रोजगार सेवकांना शासन सेवेत रुजू करून घ्यावे या मागणी बरोबरच विविध सोयी- सुविधांपासून वंचित असल्याने व त्यांच्याकडे शासन गांभीर्याने पाहात नसल्याने सोमवारपासून पालघर जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन छेडले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर