
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) सोमनाथ सातपुते .
पालघार ;सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा श्री गोपीनाथ नागरगोजे होते.तसेच प्रा.अरुण सुरती आणि प्रा प्रिती फणसेकर या प्रमुख उपस्थित होते. सदर स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली.या स्पर्धेत जवळपास 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात पुढील विद्यार्थ्यांना अनुक्रमे पारितोषिक प्राप्त झाले. प्रथम क्रमांक- किरण शिंदे द्वितीय क्रमांक- विधी सिंग तृतीय क्रमांक- सोनाली वरठा उत्तेजनार्थ- इशा संखे सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा विजय मोंडे,प्रा ऋतिका पाटील,व प्रा रुपाली चुरी मॅडम म्हणून लाभले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दिप्ती म्हात्रे यांनी केले तर आभार क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यअध्यक्षा प्रा लीना पवार यांनी केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा आनंदराव जाधव सर प्रा सविता काचरे मॅडम,प्रा स्वनित पाटील आणि प्रा वसावे सर यांनी विशेष मेहनत घेतली.

Total Users : 10829