ji24news

हिंगणघाट आगारात बस ची संख्या कमी प्रवाशांचे हाल!

हिंगणघाट आगारात बस ची संख्या कमी प्रवाशांचे हाल!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दिनेश राठोड 
हिंगणघाट – हिंगणघाट आगारात फक्त 43 एस टी बसेस आहेत, दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता या आगाराला 75 एस टी बसेस ची आवश्यकता आहे,
दररोजच्या फेऱ्यांचे नियोजन करताना आगार व्यवस्थापक व आगार नियंत्रक यांच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहतो,हिंगणघाटला लागून अनेक खेडे व शहर आहेत,ग्रामीण भागातून शहरी भागात दररोज असंख्य प्रवाशी व विद्यार्थी अप -डाऊन करतात,एस.टी.बस भरगच्च भरते,प्रवाशांना उभे राहायला पण जागा नसते,विद्यार्थ्यांच्या शाळा भरतांना व सुटतांनाचे बसेस च्या फेऱ्यांचे अचूक नियोजन आगार व्यवस्थापण करीत आहेत, शेड्युल ठरवितांना बसेस ची संख्या कमी असल्यामुळे व्यवस्थापण अडचणीत येते,
वरिष्ठ कार्यालयाकडे नवीन बसेस उपलब्ध करून घ्याव्यात म्हणून वारंवार मागणी करून सुद्धा बसेस उपलब्ध झाल्या नाहीत,वरिष्ठ कार्यालयाने महाराष्ट्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही यावर तोडगा निघाला नाही,हिंगणघाट आगाराच्या बसेस फार जुन्या व भंगार झाल्या आहेत,या बसेस चालविण्यासाठी बिचाऱ्या ड्रायव्हर ला अमाप कसरत करावी लागते,स्वतःचा व प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन बस चालवावी लागते,
एस टी कधीही भंगार होत नाहीत का? असा प्रश्न उभा राहतो आहे. रस्त्यावर धावणाऱ्या एसटीचे आठ वर्षांनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात, त्यामुळे एसटी भंगार झाली,
हे म्हणणे चुकीचे आहे,असा दावा संबंधित काही लोक करतात,
दरम्यान, अनेक वर्षांपासून वयोमर्यादा झालेल्या एसटी धावत आहेत. वारंवार ‘ब्रेक डाउन’, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशी बसेसची स्थिती झाली आहे. नवीन गाड्यांच्या अभावी स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना उपलब्ध गाड्यांची पुन्हा दुरुस्ती, रंगरंगोटी करून चालवाव्या लागत असल्याचे समजते.
कदाचित त्यामुळेच अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव एसटी भंगार होत नाहीत, असा अजब दावा करावा लागला असेल. हिंगणघाट आगारांमधील 43 बस वाहनांपैकी 10 वाहनांना आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.दरम्यान, जोपर्यंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंत त्या चालणार नाहीत, या मागणीसाठी अनेकदा वरिष्ठांना पत्र लिहिले आहे व संपर्क सुद्धा केला आहे. व कृपया आम्हाला लवकरात लवकर नवीन बसेस उपलब्ध करून समस्येवर शक्य तितक्या लवकर तोडगा काढा अशी विंनती करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगाराच्या कर्मशाळेत यांत्रिकीच्या अनेक जागा रिक्त आहेत. . मागील अनेक वर्षांपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळाचाही अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. याशविाय, आगारातील प्रशासनाने एसटीची योग्य काळजी घेतल्यास अनेक समस्यांपासून आपसूकच सुटका मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
एसटीच्या कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत एसटी बसेस ‘आरसी’ करण्यात येते. काही गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, एक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. येथेच टायर रीमोल्ड प्रक्रिया होेते. एखाद्या एसटी बसला आठ वर्षे पूर्ण झाली किंवा अपघात झाल्यास येथे दुरुस्ती करण्यात येते.
स्पीड ब्रेकरमुळेही एसटी बसेस खिळखिळ्या होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एसटी बसेसची वयोमर्यादा आठ वर्षे असली, तरी स्पीड ब्रेकरमुळे लवकरच ही वाहनं खिळखिळी होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
एसटीमध्ये प्रवाशांच्या जीविताची पूर्ण काळजी घेण्यात येते. एसटी गाडीची वयोमर्यादा आठ वर्षांची असते. विभागीय कार्यशाळेत एसटीची दुरुस्ती करण्यात येते. आरटीओ नियमानुसारच रस्त्यावरून एसटी धावते.असे आगार प्रमुख मेश्राम साहेब व आगार व्यवस्थापक नेवारे साहेब ह्यांनी सांगितले,

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर