
जिल्हास्तरीय थ्रो बॉल व कॅरम स्पर्धा संपन्न….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर दि. 7 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय थ्रो बॉल व कॅरम स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल खारेकुरण रोड पालघर येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी उद्घाटक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, प्रमुख पाहुणे सोनोपन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे उपस्थित होते उपस्थिताचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळेस पालघर जिल्ह्यातील 400 खेळाडू, शिक्षक व प्रशिक्षक सहभागी होते. उद्घाटन पर भाषण करताना आदिवासी ग्रामीण भागातील खेळाडूंना उच्च प्रतीचे प्रशिक्षण व सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा क्रीडा संकुल उच्च प्रतीचे व आदर्शवत निर्माण करू व त्यास सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन प्रकाश निकम यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ किरण सावे यांनी पोलिओग्रस्त मुलगी ते ऑलम्पिक मेडलिस्ट खेळाडूंचे उदाहरण देऊन खेळाडूंच्या मनात खेळ व पदक प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि सातत्य कसे असावे या बाबत मनोगत व्यक्त केले व खेळाडूंच्यात नवसंजीवनी, प्रेरणा निर्माण केली. या प्रसंगी सम्राट बॅडमिंटन अकॅडमीचे श्री. गवई प्रकाश पळसुले, श्री. गमरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच, दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. रक्तकर्ण प्रा. किरण थोरात यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले

Total Users : 10829