
महा आवास योजना – 2.0 मध्ये पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका सर्वोत्कृष्ट…
जोहार इंडिया 24 न्यूज – मोखाडा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेला गतिमानता मिळावी याकरिता “महा आवास अभियान 2.0” राबविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद पालघर मधील मोखाडा तालुक्याने सन – 2020-21 या वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत कोकण विभागात सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार मिळवला होता. सन 2021-22 या वर्षात देखील मोखाडा तालुक्याने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत जिल्ह्यात सर्वाधिक घरकुल पूर्ण करण्यात प्रथम सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून आसे ग्रामपंचायतीस तसेच सर्वोत्कृष्ट गटात पोशेरा गटाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे, याकरीता आसे ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री आर. के. गोडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता श्री अनिकेत कदम आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर श्री अविनाश झिरवाळ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच तालुक्याची कामगिरी उत्तम राखत जिल्ह्याचे घरकुल पूर्ण करण्यात विशेष योगदान दिल्याबद्दल श्री. तुषार सुर्यवंशी ( विस्तार अधिकारी- पंचायत समिती – मोखाडा ) यांना जिल्हा विशेष पुरस्कार” माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब (मंत्री, सार्वजनिक बांधकाम) तसेच माननीय श्री प्रकाशजी निकम साहेब (अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, राज्य मंत्री दर्जा) यांचे हस्ते देण्यात आला. या विशेष उल्लेखनीय कामगिरीकरिता श्री.तुषार सूर्यवंशी यांचे कौतुक होत आहे.
Total Users : 10829