
माळघर व दापटी गावात जलजीवन मिशन योजनेच्या नवीन कामाचा शुभारंभ सोहळा संपन्न.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )जव्हार -मनोज कामडी.
जल जिवन मिशन योजनेमार्फत सध्या जव्हार तालुक्यातील प्रत्येक गाव पाड्यामध्ये हर घर नळ योजनेतून पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कामाची सुरुवात केली असून आज जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या ग्रामपंचायत हातेरी मधील माळघर व दापटी येथे नवीन कामाचा शुभारंभ आज ग्रामपंचायत हातेरीचे सरपंच रतन सोमा कोकाटे,यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्याचासोबत ग्रामपंचायतच्या उपसरपंच उज्वला संतोष भोये,ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी व लक्ष्मण वझरे यांची प्रमुख उपस्थिती होते. सदर योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायत मध्ये पाण्याची टंचाई खूप वर्षापासुन समस्या होती त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने आमच्या ग्रामपंचायत साठी जलजीवन मिशन योजनेसाठी दोन गावांना मिळून १ कोटी ९० हजार रुपये खर्च करून या योजनेच्या माध्यमातून प्रती व्यक्ती ५५ लिटर पाणी पोचवून प्रत्येक घरात नळ कनेक्शन देऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा घेऊन पाणी टंचाई मुक्त गावे होणार म्हणून माळघर व दापटी येथील महिला व ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळाला.या कामाच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती जव्हार पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य , महिला प्रतिनिधी नलिनीताई गावीत, इनताझ भाई लूलानिया, सुनिल वझरे, दीपक वाघेरा, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गावीत, रघुनाथ गावीत, दत्तू कामडी, अनंता राऊत, प्रदीप वाघेरा, संतोष भोये व महिला वर्ग,ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Total Users : 10829