
खोस्ते ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दिपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्या खोस्ते या ग्रामपंचायत मध्ये या 2021-2022 वर्षी निवड झालेले सरपंच, उप सरपंच ,सदस्य अशी निवड झाली. आज दिनांक 8/12/2022 या गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत खोस्ते येथे सभा पार पडली. 2023 ते 24 या ग्रामसभेमध्ये मनरेगेचा आराखडा तयार करणे. नवीन मतदार यादीचे वाचन करण्यात आले. पेसा कामाचं आराखडा तयार करणे. वन हक्क अधिनियम, आणि रोजगार हमीची कामे, शबरी मधून आलेले घरकुल योजना, तंटामुक्ती अध्यक्ष नेमणूक, इतर कामे अशी अनेक प्रकारची कामाचे नियोजन करून या ग्राम सभेमध्ये अनेक प्रकारची कामे आहेत त्यांनी नियोजन केली याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.रोजगार सेवकाचे कामाचं बाबत नेमणुकी बाबत वादाचा विषय ठरला. सौ. निलम भास्कर भोये ( सरपंच ) यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.ग्रामसेवक संजय वाघ साहेब ग्रामपंचयतमधील कर्मचारी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Total Users : 10829