
श्री. साईबाबा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन चरित्र अभिवादन परीक्षा संपन्न..
.जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : वार्ताहर, प्रा.दिनेश राठोड.
जिल्ह्यातील वडणेर येथील
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र अभिवादन परीक्षा -2022” चे आयोजन करण्यात आलेले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये एकूण 77 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महापुरुषांचे जीवन चरित्र हे विद्यार्थ्यांना प्रेरणा निर्माण करणारे असते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर , श्री. निखार सर, श्री. देवळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या परीक्षेचे नियोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. पंकज मून व डॉ. गणेश बहादे यांनी केलेलं होते.

Total Users : 10829