
विक्रमगड व जव्हार काही भागात अवकाळी पाऊस रब्बी पिकांना धोका…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ).दीपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड व जव्हार तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक व अवकाळी पाऊस पडला. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दरम्यान बुधवारी पालघर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाला हजेरी लावली. काही भागात तुरळक व काही भागात जोरदार विजेच्या गडगडाटांनीसह पाऊस पडला. विक्रमगड परिसरात या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्याचे कर्जबाजारी झाला आहे. आता अवकाळी पावसाचा फटका त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाले आहे.
Total Users : 10829