ji24news

परिचालक संघटना पालघर यांना कर्मचारी दर्जा देवून मासिक वेतनाची मागणी.

परिचालक संघटना पालघर यांना कर्मचारी दर्जा देवून मासिक वेतनाची मागणी.

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )\:दीपक भोये
विक्रमगड

संगणक परिचालक संघटना ही राज्यात सुमारे २१ हजार ग्रामपंचायती ,३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणी असलेले संगणक परिचालक मागील १० वर्षापासून काम करत असून यामधील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन ६९३० रुपये मिळत आहे यात या महागाईच्या काळात त्या संगणक परीचालकांचे कुटंब कसे चालवायचे ? हा प्रश्न आहे त्या निमित्ताने विक्रमगड विधानसभाचे मतदार संघाचे मा .आमदार सुनिलजी भुसारा साहेब यांना निवेदन दिले.

या मागील २९ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रश्न सोडविण्याचे वचन आझाद मैदानावर येवून दिलेले होते त्याचबरोबर राज्याचे माजी उमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिले होते परंतु अजून सुद्धा परिस्थिती आहे तीच बघायला मिळत आहे .१८ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाचे आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव घेतले परंतु त्या वेळेस निधीचा अडचण असल्यास सांगितले.परंतु ही कारणे आता बाजूला ठेवून आम्हाला आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी म्हणून नियुक्ती देवून राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन देण्याची तरदुत करावी किंवा सुधारित आकृतीबंधानुसार सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देवून राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन देण्याची तरदुत करावी किंवा सुधारित आकृतीबंधानुसार सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देवून राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन तरतूद करावी .या कडे शासनाने प्रत्यक्ष लक्ष देवून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी संगणक परीचालकांची मागणी आहे.

या प्रसंगी संगणक परिचालक संघटना चे तालुका उपाध्यक्ष अविनाश घाटाळ,तालुका सचिव नागेश खुरकुटे ,संदेश जाबर ,अजय , सिताराम गरेल व इतर सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर