
टोपलेपाडा ते म्हसेपाडा रस्त्याला वनविभागाची परवानगी मिळाली , आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सततच्या पाठपुराव्यामुळे यश…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये .
वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवरील व २ नद्यांच्या बेटांवर वसलेले म्हसेपाडा एक गाव ,मलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत असलले हे एक महसुल गाव स्वातंत्र्याचा काळापासुन या गावामध्ये ये-जा करणेसाठी रस्त्याची व्यवस्था नाही,विजेची सोय नाही,अशा या गावामध्ये कुणीही लक्ष देत नव्हते निवडणुका आल्या की सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने द्यायचे नंतर जैसे थे परिस्थीती म्हसेपाड्यातील शाळकरी मुले,गरोदर माता,वृद्ध व्यक्ती,स्थानिक रहिवासी हे पावसाळ्यात नदीपात्रामधुन टायरच्या ट्युबचा वापर करत ये-जा करतात , काही पुराच्या पाण्यात वाहुन सुद्धा गेले आहेत,अशा गावाची माहिती आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व पालघर जिल्हा कमिटीचे सचिव अनंता वनगा व पदाधिकारी यांना समजताच या गावाला भेट देवुन समस्या समजुन घेतली,गावाच्या सहकार्याने व अनंता वनगा यांच्या नेतृत्वाने विक्रमगड तहसिलदार कार्यालयाच्या समोर सन- २०१४ मध्ये आमरण उपोषण करुन या गावाची विजेची समस्या कायमची सोडवली , तसेच रस्त्याची समस्येसंर्दभात शासन स्तरावर पाठपुरावा चालु ठेवला , रस्त्यासाठी वनखात्याची जागा जात असल्याने अनेक अडचणी येत होत्या , परंतु प्रखर इच्छाशक्ती असलेले अनंता वनगा यांनी हार मानली नाही, तहसिलदार कार्यालय विक्रमगड , वनविभाग वाडा पुर्व यांच्याकडे निवेदने देवुन ग्रामपंचायतने तयार केलेल्या ३/२ चा प्रस्तावाचा पाठपुरावा सुरु केला तसेच ३/२ चा प्रस्ताव परिपुर्ण झाल्यावर सहाय्यक वनसंरक्षक म्हस्के यांनी उपवनसंरक्षक एन , एस, दिवाकर यांच्याकडे पाठवला व दिवाकर यांनी त्वरीत परवानगी देवुन वनविभागाच्या जागेतुन जाणाऱ्या रस्त्याला दि. १३/१२/२०२२ रोजी परवानगीचे पत्र आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा यांच्याकडे देवुन वाडा पंचायत समितीकडे देण्यास सांगितले . 
वर्षानुवर्षे म्हसेपाड्यातील रहिवासी हे रस्त्याअभावी मरण यातना सहन करत होते , परंतु उपवनसंरक्षक जव्हार वनविभागाने दिलेल्या परवानगीने म्हसेपाड्यातील जनतेला त्यांच्या दळणवळणाचा हक्काचा रस्ता मिळणार असे अनंता वनगा हे म्हणाले.

Total Users : 10829