
वडनेर येथील प्रणय फुलझले यांचा सत्कार
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा- : प्रा.दिनेश राठोड
दिनांक १६/१२/२०२२ रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील प्रणय मिलिंद फुलझेले आयआयटी वेस्ट बंगाल खडकपूर येथे अनुसूचित जातीच्या राखीव कोट्यातून निवड झाली आहे , प्रणय फुलझले वय २२ वडनेर येथील रहिवाशी असून तो इयत्ता 6 वीत असतांना त्याची निवड नवोदयमध्ये झाली होती,व तो इयत्ता मध्ये 10 वीत शिकत असतांना त्याची निवड दक्षणा फाउंडेशन हैदराबाद येथे झालेली आहे, प्रणयचे वडील मिलिंद फुलझेले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते तद्नंतर त्याच्या आईन अंगणवाडी सेविका म्हणून काम करून आपल्या मुलाचे योग्यरित्या पालन पोषण केले, प्रणयने गरीब परिस्थितीची पर्वा न करता अथक प्रयत्न व अभ्यास करून त्याने आपल्या आईवडिलांचे नाव रोशन केले आहे,वडनेर गावामध्ये प्रणयचे जल्लोषात स्वागत करण्यात आले,याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंग जुनी व गावातील नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले,याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंग जुनी,पंढरीभाऊ शिवणकर, सामाजिक कार्यकर्ते, दिनकरभाऊ दरोडे, हरिभाऊ गायधने,महिंद्राभाऊ महाजन,विजुभाऊ ढोक, हरिदासजी गायधने, नारायणराव कुंभारे ,चोकोबा कुंभारे ,प्रदीप राव माणिकपुरे, प्रशांत दरोडे, प्रतीक जवादे , गणेश काटेकर मनोज कळसकरअमोल काटेकर ,विजय डोंगरे, प्रतीक जवादे, प्रतीक खैरे,अभिजीत जारोंडे माहिती अधिकार पोलीस पत्रकार संरक्षण हिंगणघाट तालुका अध्यक्ष सचिन महाजन आदी उपस्थित होते, .
Total Users : 10829