
विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोल्हारी बुद्रुक गावातील ग्रामसभा संपन्न झाली.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील विविध ठिकाणी गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत सभा आणि ग्रामपंचायत सभा संपन्न झालेल्या आहेत त्याच पद्धतीने डोल्हारी बुद्रुक येथे सुद्धा ग्राम सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये विविध प्रकारची कामे असतात तर ती त्यांनी योग्य रीतीने नियोजन करून आणि चर्चा अश्या पद्धतीने केली की,2023 ते 2024 याचा आराखडा तयार करण्यात आला, केंद्र शासनाच्या योजने नुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंब व उर्वरित राहिलेले घर तेथे सौचालय तयार करणे, अठरा वर्षां खालील वाहन परवाना नसलेल्यांना वाहन चालवण्यासाठी बंदी करण्यात आली, मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष होई पर्यंत विवाहास आई वडील व गावकऱ्यास विवाह संदर्भातील विधी करता येणार नाही.
त्याच बरोबर श्री. लक्ष्मण सुतार यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटीस मार्गदर्शन केले. श्री. बाबू मोरे यांनी ग्रामस्थांना शेतीविषयी माहिती दिली गेली.समारोपच्या भाषणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा ठाणे व पालघर जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड. श्री. किरण गहला साहेब यांनी सर्व विषयांना हात घालत मार्गदर्शन केले.
तसेच संकुल पालघर येथे झालेल्या मुंबई विभाग शालेय कबड्डी मुली क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दोल्हरी बुद्रुक येथील मुलींनी शाळेच्या वतीने द्वितीय क्रमांक म्हणून यश प्राप्त केले होते.
म्हणून या शाळेचे व शाळेतील मुलींचे तसेच येथील शिक्षक श्री. संतोष उमतोल यांचा सत्कार करण्यात आला.
आणि अश्या पद्धतीने समारोप योग्य रीतीने होऊन ग्राम सभा संपन्न झाली.
या ग्राम सभेचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. विलास राज्या गहला (सरपंच), होते, आणि मा. श्री. महेश खरपडे (उपसरपंच) तसेच सदस्य पदी मा. श्री. शरद ठाकरे, मा. श्री. विनोद गहला, मा. श्री. निलेश कचरा, सौ. निर्वाता उंबरसाडा, सौ. संगीता टोकरे, सौ. दीपिका म्हसकर, सौ. मनीषा गहला, सौ. रेणुका दोडे, कु. पूनम डावरे
आदी उपस्थित होते.
या ग्राम सभेचे अध्यक्षस्थान दोल्हारी ग्रुप ग्रामपंचायत कर्तव्यदक्ष सरपंच मा. श्री. विलास राज्या गहाला उपस्थित होते.

Total Users : 10829