
यारी दोस्ती ग्रुप ने राबविला शैक्षणिक उपक्रम…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी, यारी दोस्ती फाऊंडेशन कडून डहाणू तालुक्यातील वानगाव डेहणे ( खुमारपाडा) येथील जि. प. मराठी शाळेमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविला. सदर शैक्षणिक उपक्रमामध्ये यारी दोस्ती ग्रुप कडून शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, यामध्ये चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची या स्पर्धा राबवून त्यांचे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप कडून बक्षीस देण्यात आले. शाळेतील मुलांसोबत यारी दोस्ती ग्रुप सदस्यांनी सुद्धा संगीत खुर्चीचा आनंद घेतला. शाळेत उपस्थित सर्व मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच शाळेसाठी ग्रुप कडून एक घड्याळ भेट म्हणून देण्यात आले. तसेच उपक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून या शैक्षणिक उपक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रम आयोजित केला म्हणून शाळेतील शिक्षकांनी ग्रुप चे खूप खूप आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक, यारी दोस्ती ग्रुप सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Users : 10829