
इंदिरा गांधी विद्यालय वडनेर येथे अपूर्व विज्ञान मेळावा तसेच गणित प्रतिकृती प्रदर्शन संपन्न…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : प्रा.दिनेश राठोड
दिनांक 21 जून 2022 ला शाळेत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी आणि गणिताची भीती कमी करण्यासाठी
या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्याध्यापक वंदना खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिकृतीचे मूल्यमापन करण्याकरता श्री बोरकर सर यांना आमंत्रित करण्यात आले. या प्रदर्शनत 35 प्रदर्शनीय वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच ,’आमच्यासाठी गणित ‘ या संकल्पनेतून गणिताच चार्ट आणि प्रतिकृती सादर करण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञानाबाबत आदर निर्माण व्हावा आणि संबोध स्पष्ट व्हावे यासाठी विज्ञान शिक्षिका सौ.कल्पना मडावी यांनी या प्रदर्शनीचे संचालन केले. याप्रसंगी वडनेर येथील पालकांनी ग्रामस्थांनी आणि प्राथमिक शाळा वडनेर ,के टी महाजन प्राथमिक यांनी प्रदर्शनी ला भेटी दिल्या. सर्व छोट्या वैज्ञानिकांचे कौतुक केले. याप्रसंगी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व
शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Total Users : 10829