
टोपलेपाडा ते म्हसेपाडा रस्ता रोजगार हमीतून त्वरित सुरु करावा,म्हसेपाडा येथील ग्रामस्थ व काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अनंता वनगा यांनी निवेदन देऊन केली मागणी……..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये
आज 19/12/2022 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती वाडा येथे टोपले पाडा ते म्हसेपाडा रस्ता रोजगार हमी योजनेतुन चालू करावा,आत्ताच जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षक एन एस दिवाकर यांनी टोपलेपाडा ते म्हसेपाडा रस्त्याला वनाच्या जमीनीतून रस्त्याचे काम करणेस परवानगी दिली असुन सदरचे काम सुरु झाल्यास मजुरांना रोजगार मिळेल व म्हसेपाड्यातील आदिवासी लोकवस्तीला हक्काचा रस्ता मिळेल अशा मागण्यांचे निवेदन व वनविभागाचे परवानगीचे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांच्या कार्यालयात देण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे अनंता वनगा,काँग्रेस आदिवासी विभागाचे वाडा तालुका अध्यक्ष बाळा लहांगे,आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेचे वाडा तालुका सदस्य राजू बातरा व म्हसेपाडा येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते!*
Total Users : 10829