ji24news

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कातकरी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन. पालघर जिल्ह्यातील मा. राज्यपालांच्या कातकरी समाजाच्या मेळाव्यास उपस्थितीमुळे कातकरी विकासाला चालना…

–महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कातकरी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन. पालघर जिल्ह्यातील मा. राज्यपालांच्या कातकरी समाजाच्या मेळाव्यास उपस्थितीमुळे कातकरी विकासाला चालना……..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड -दीपक भोये.

प्रकल्पाधिकारी कार्यालय जव्हार तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा येथील मॅनेजमेंट कॉलेज मध्ये कातकरी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय व त्यातून रोजगार निर्मिती कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
शेती व शेती व्यवसायाशी निगडीत लघुउद्योगातून प्रगती कशी साधता येईल या बाबतीत श्री. आघाव साहेब, सौ. निखाडे मॅडम या शिवाय इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शेकर्यांमधून सुद्धा श्री. गोविंद सवर यांनी आपले अनुभव विशद केले. महाराष्ट्रातील कातकरी समाज हा अती मागास असून शासनाने त्यांच्या ह्या अतीमागासलेपणामुळे त्यांना आदिम जमात जाहीर केले आहे. स्थलांतर, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, कुपोषण, वेठबिगारी अशा अनेक बाबतीत हा समाज अडकलेला असून त्यांना शासकीय पातळीवरून प्रामाणिक सहकार्य करणे गरजेचे आहे. असे पालघर क्षेत्र समन्वयक श्री. रविंद्र भुरकूंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्री. आघाव साहेब,तालुका कृषी अधिकारी मा. सौ. निखाडे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक श्री. शाम चिंचमलातपूरकर, क्षेत्र समन्वयक आदिम जमाती योजना श्री. रविंद्र भुरकूंडे, ग्रामसाथी श्री‌ दयानंद पवार, शेतकरी श्री. गोविंद सवर, देवराम मुकणे, प्रकाश सवर, पंडीत सवर यांच्यासह तालुक्यातील ५० कातकरी शेतकरी उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर