ji24news

गणित, इंग्रजी व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…..

गणित, इंग्रजी व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला……

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये

22 डिसेंबर हा महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती. या निमित्ताने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (‌ सेकंड चान्स प्रोग्राम, हमारा गाव) अँड ट्रूबो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 डिसेंबर 2022 रोजी गणित इंग्रजी व विज्ञान या विषया वर आधारित शैक्षणिक मिळण्याचे आयोजन करण्यात आले होते. सेकंड चान्स प्रोग्राम मार्फत अपूर्ण राहिलेले शिक्षणाचे स्वप्न पुन्हा उराशी बाळगून, घराचा आर्थिक भार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्याच कडवा आव्हान स्वीकारत. आता विक्रमगड तालुक्यातील महिला करत आहे दहावी परीक्षेची तयारी. गणित बद्दलची असलेली भीती दूर करण्याकरिता व त्यांच्यामध्ये असलेले सतगुळांना भाव मिळण्याकरिता विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम तयार करून घेण्यात आले. यामध्ये गणित विज्ञान व इंग्रजी या विषयाचे उपक्रम तयार केले होते ते पालकांसमोर तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. पालकांनी, अधिकाऱ्यांनीही देखील महिलांनी केलेले असादरीकरणाचे कौतुक केले व प्रत्येक उपक्रमाबद्दल माहिती विद्यार्थ्यांकडून समजून घेतली. याप्रसंगी माननीय राजश्री पाटील मॅडम ( जि.प पालघर समन्वयक) यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपक्रमाविषयी जाणून घेतले व त्यांचे मनोबल वाढेल. तसेच माननीय गटशिक्षण अधिकारी शिनगारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. माननीय सभापती कनोजा साहेब यांनी त्यांच्या जीवनातील घडामोडी बद्दल या शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. माननीय कैलास कुवरा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेलपाडा, या. श्री. रविंद्र चाबके मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वेहेलपाडा , इतर शिक्षक वृंद , गावातील माता पालक, शिक्षण प्रेमी व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे कार्यक्रम प्रमुख हरीश खोब्रागडे सर, तसेच रवींद्र त्रिभुवन सर व गणेश ठाणे सर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम यशवंत कांबळे सरांनी केले व कार्यक्रमाची रूपरेषा रवींद्र त्रिभुवन सरांनी केली. सोबतच अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी पण यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन टीमने परिश्रम घेऊन मेळाव्याचे आयोजन केले होते.
मनोगत
प्रथम संस्थेच्या पुढाकाराने दहावीच्या परीक्षेत बसलेल्या महिला व शालेय विद्यार्थी यांना विविध शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण केले ते कौतुकास्पद होते. आई आणि मुलं सोबत शिकत आहे एका मंचावर काम करत आहे असे प्रत्येक गावात चित्र पाहावेस मिळाले तर ही प्रगत भारताची नांदी आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हा वसा असाच टिकून ठेवा व सध्या तर राहू द्या या पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व खूप खूप शुभेच्छा.
श्रीमती. राजर्षी पाटील
(जि.प.पालघर जिल्हा समन्वयक)

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर