
वाकी गावाचे सुपुत्र माजी पोलीस पाटील कै.रघुनाथ महाकाळ यांचे दु:खद निधन….*
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
विक्रमगड..आज वार शनिवार दिनांक 24/12/2022 रोजी विक्रमगड तालुक्यातील वाकी गावातील कै. रघुनाथ धाऊ महाकाळ यांचे वयाच्या 89 वर्षी वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले. त्यांनी 1973 पासून 2009 पर्यंत ते कार्यरत होते त्यांनी गावच्या पोलीस पाटील पदावर नागरिकांना चांगल्या प्रकारे वादविवाद सोडविण्यासाठी व न्यायदेण्याचे कार्य उत्तमप्रकारे केले असून. ते पोलीस पाटील या पदावरून निवृत्तीनंतर त्यांनी 2015 ते 2019 पर्यंत ते वाकी ग्रामपंचायतचे सरपंच निवडून येऊन या पदावर समाजसेवा केली.व अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून वारकरी सांप्रदाय निर्माण करून हरिपाठ – भजन,पुजा, किर्तन प्रथा वाकी गावात सुरू केली त्यांच्या निधनाने महाकाळ परिवारासह गावात शोककळा पसरली आहे.
Total Users : 10829