
वडनेर येथे परिसरातील 300 स्पर्धेकांचा मोठा सहभाग ,तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन…
: जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा ;प्रा.दिनेश राठोड
दिनांक २५/१२/२०२२ रोजी
स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडनेर येथे नेहरू युवा केंद्र वर्धा, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी महाविद्यालयचे प्रा.दिनेश राठोड, मार्गदर्शक म्हूणन वडनेर पोलीस कर्मचारी खुशबू बोरघाटे मॅडम,पवन वानखेडे मॅडम,तुषार इंगळे सर,प्रशांत मेश्राम सर तर
प्रमुख अतिथी म्हूणन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे प्रा.किणेकर, प्रा.झोटिंग, प्रा. बामुडे, प्रा.लांबट तर वडनेरचे युवा व्यावसायिक श्री. योगेशभाऊ पोहाणे, श्री.नमित हस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मैदानाचे पूजन करून खेळास सुरुवात करण्यात आली.यावेळी कब्बड्डी, रनींग, लांब उडी, गोळाफेक व हॉलिबॉल अश्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा परीक्षा करिता व इतर नौकरी करिता क्रीडाच्या प्रमाणपत्रास जास्त महत्व असते असे मत वडनेर पोलीस स्टेशनचे तुषार इंगळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी खेळास मित्र बनून खेळ खेळावे असे मत वडनेर पोलीस स्टेशनच्या पवन वानखेडे ,खुशबू मॅडम,यांनी व्यक्त केले. खेळामुळे व्यक्तीच्या शरीराचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो असे मत विकास कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा.लांबट यांनी व्यक्त केले. खेळ हा माणसाचा सर्वांगीन विकास करण्याचे माध्यम आहेत. जिंकण्यासाठी आणि बक्षीस मिळविण्यासाठी खेळू नका तर स्वतःचे आयुष्य घडविण्यासाठी खेळ खेळावा असे मत अध्यक्षीय भाषानातून प्रा.दिनेश राठोड यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या आयोजनाकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुरतकर, कार्यक्रम अधिकारी विकास तिजारे, माहिती व जनसंपर्क प्रमुख सचिन महाजन, आर. टी. आय कॉम्प्युटर च्या शिक्षिका व कार्यक्रम नियोजन समितीच्या अध्यक्षा राखी जाधव, उपाध्यक्षा वैष्णवी चहाणंदकर, सचिव सौ. मनीषा दुरतकर व स्वप्नील जीवतोडे ,मोठया प्रमाणात नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता

Total Users : 10829