ji24news

राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी ‘फ्लेम युनिटी रन’ पथकाचे श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयाच्या वतीने स्वागत…

राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी ‘फ्लेम युनिटी रन’ पथकाचे श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयाच्या वतीने स्वागत….

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा प्रा. दिनेश राठोड.

दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी
एन.सी.सी. स्थापनेच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशवाशीयांत, विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे याच उद्देश्याने तीन विश्व रेकॉर्ड चे मानकरी कर्नल बधवार यांनी कन्याकुमारी ते दिल्ली हे 3000 किलोमीटर अंतर 60 दिवसात धावून पूर्ण करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी कन्याकुमारी पासून धावायला सुरुवात केली. रोज 51 कि.मी. धावणारे कर्नल बधवार श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडणेर येथे कर्नल मलिक यांच्या मार्गदर्शनात छात्रसैनिक व विद्यार्थी यांच्या दुतर्फा रांगेत उभ्या विद्यार्थ्यांनी तिरंगे फडकवून व राष्ट्रभक्तीपर घोषणा देऊन स्वागत केले. कर्नल मृगसेन, इतर सैनिक अधिकारी व छात्र सैनिकांनी सैलूट देऊन धावपटू बधवार यांच्या कडून पेटती मशाल घेऊन त्यांचे स्वागत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर, उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, समन्वयक डॉ. विनोद मुडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश बहादे, डॉ. पंकज मून, डॉ. विठ्ठल घिनमिने, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. नरेश भोयर, प्रा. आरती देशमुख यांनी केले.
कर्नल बधवार व कर्नल मलिक यांनी एन.सी.सी बाबत, राष्ट्रीय एकात्मतेविषयी, देशातील सैन्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच एन.सी.सी 21 महाराष्ट्र बटालियनचे ले. कर्नल मृगसेन व कॅप्टन गुजरकर यांच्या मार्गदर्शनात छात्र सैनिकांच्या शिस्तबध्द कवायती, एन.सी.सी. बटालियनचा टेंट व राष्ट्रभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला होता. चैतन्यमय क्षणांत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर यांनी या कार्यक्रमाचे औचित्य विषद केले. स्वागत पर भाषणात डॉ. पारेकर म्हणाले, ‘सूर्याच्या उत्तरायणाच्या पहिल्याच दिवशी कर्नल बधवार राष्ट्रभक्तीची उर्जा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. या महाविद्यालय परिसरात आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतोत. विद्यार्थ्याशी संवाद साधत कर्नल बधवार म्हणाले की जीवनात यश संपादन करण्यासाठी जीवनाचे लक्ष निश्चित केले पाहिजे. जीवन स्पर्धेत अग्रेसर असणारेच जीवनाचे ईप्सित साध्य करतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता कर्नल बधवार यांना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी वेणा शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. दिवाकर गमे, वडणेर परिसरातील नागरिक, विद्यार्थी, छात्र सैनिक, सैनिक अधिकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर यांनी संविधान चौक वडणेर येथे स्वागत करून प्रा. दिवाकर गमे यांनी हिरवा झेंडा दाखविला. कर्नल बधवार यांनी घड्याळ सेट करून पेटती मशाल हातात घेऊन पूढील 51 कि.मी. ची मजल मारण्यासाठी धावायला सुरुवात केली. तिरंगे फडकवित व राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत एकून ७२ व्यक्तींनी त्यात सैनिक अधिकारी, छात्र सैनिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, इतर कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवीत कर्नल बधवार यांच्या सोबत दोन किलोमीटर पर्यन्त धावत गेले. त्याच वेळी सूर्याने क्षितिजावरून डोके वर काढत सर्वांना दर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी सचिन महाजन, राहुल दुरतकर, शंकर कापसे, नरेश कातडे, प्रिती सांयकार, अंकुश वैद्य, सुरेश तेलतुंबडे, प्रफुल शिंदे, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे, रुचिता वेले, दिव्याभारती अवचट, रक्षा वाटे, मोनली लडके, मयूरी डोलसकर, दर्शना शिवणकर, स्वाती सुपारे, स्नेहल कामाटकर, चेतन साठोने, अभय पोहणे यांनी अथक परिश्रम घेतले. दोन दिवसीय समारंभाचे संचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या वतीने समन्वयक डॉ. विनोद मुडे केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर