ji24news

पालकांनो सावधान,लहान मुलांना अन्नातून विषबाधा होण्याचे वाढले प्रमाण!

पालकांनो सावधान,लहान मुलांना अन्नातून विषबाधा होण्याचे वाढले प्रमाण!

 जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : प्रा.दिनेश राठोड

आजकाल लहान मुलांना अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे,
अन्नातून कोणालाही विषबाधा (Food poisoning) होऊ शकते. परंतु लहान मुलांना याचा अधिक धोका असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (children Immune system) विकसित झालेली नसते. लहान मुलांचं पोट बिघडलंय असं वाटल्यास लगेच काही गोष्टी करायला आणि काही टाळायला हव्यात.
मुलांना होणारा फूड पॉयझनिंग (Food poisoning) हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. विषारी अन्नपदार्थ ( Toxic foods) खाण्यात आल्यानंतर फूड पॉयझनिंग होत असते. खराब झालेल्या अन्नातून कोणालाही विषबाधा होऊ शकते. परंतु लहान मुलांना याचा अधिक धोका (Food poisoning to children) असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (Childrens Immune System) जंतूंशी लढण्यासाठी हवी तेवढी विकसित झालेली नसते. अशा परिस्थितीत जीवाणू किंवा विषाणूंमुळे विषारी झालेले अन्न मुलांच्या खाण्यापिण्यात आले तर त्यांना विषबाधा (Food poisoning occurs) होऊ शकते.
आहारतज्ञानी व बालरोतज्ञानी दिलेल्या माहितीनुसार अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर मुलांमध्ये पोटदुखी, जुलाब, उलट्या, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता भासू शकते. परंतु ते टाळण्यासाठी मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
फायबरयुक्त पदार्थ टाळा: फायबरयुक्त अन्न आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतु मुलांना अन्नातून विषबाधा झाली असेल तर त्यांना हाय फायबर फूड देणे टाळावे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलाचे पोट खराब होते आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असते. अशा वेळी डाळ किंवा साल असलेल्या भाज्या असे फायबरयुक्त अन्न बाळाला दिल्यास पोटात जास्त जळजळ होते. अशा स्थितीत बाळाला अतिशय हलके आणि द्रव पदार्थ खायला देण्याचा प्रयत्न करा.
शितपेयं टाळा: अन्नातून विषबाधा झाली तर मुलांना पोटदुखी वगैरे सारखा त्रास होऊ शकतो. अशा वेळी अनेक वेळा पालक मुलाच्या पोटात थंडावा मिळावा म्हणून त्यांना काही शीतपेये प्यायला देतात. परंतु यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. कोल्ड ड्रिंक मुळे शरीर अधिक डिहाइड्रेट होते.अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलांना उलट्या आणि जुलाब होतात आणि त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा स्थितीत त्यांनी कोल्ड्रिंक्सचे सेवन केले तर समस्या आणखी वाढू शकते.
पॅकेज्ड पदार्थ : मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यास त्यांना,चिप्स,चॉकलेट्स,नूडल्स,
इत्यादी पॅकज्ड केलेले पदार्थ देणे टाळा. कारण त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. तसेच फूड पॉयझनिंग झाल्यास मुलांना स्टमक लायनिंगला ग्लूटेनपासून दूर ठेवणे गरजेचे असते. पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये ग्लूटेन आढळते. त्यामुळे मुलांना मैदा असलेले पदार्थ किंवा बिस्किटे इत्यादी देणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही त्यांना खिचडी वगैरे खायला देऊ शकता यामुळे त्याच्या पोटाला आराम मिळेल.
चहा-कॉफी टाळा : अन्नातून विषबाधा झाल्यानंतर मुलांना चहा-कॉफी देणे टाळावे. कॉफीमुळे मुलांना थोडा वेळ ताजेतवाणे वाटू शकते. परंतु त्यात असलेल्या कॅफीनमुळे शरीर अधिक डिहायड्रेट होऊ शकते. अशी कोणतीही वस्तू मुलाला देऊ नका ज्यामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशन होईल.सध्याच्या स्थितीत प्रत्येक दवाखान्यात छोटे बालक रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे,पालकांनी या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून बालक आजारी पडू नये.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर