
शिवछत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान आयोजित कासा येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलींनी प्रथम क्रमांकाने विजयी …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शिवछत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान आयोजित कासा येथे झालेल्या कबड्डी मुली क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक या शाळेतील मुलींनी आता पर्यंत तीन ठिकाणी क्रमांक यशस्वी प्राप्त केले आहेत.
पहिले सामने जिल्हा संकुल पालघर येथे झालेल्या मुंबई विभाग येथे दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच तलासरी तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन आयोजित उधवा येथे झालेल्या किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक यशस्वी प्राप्त केले होते आणि आता पुन्हा एकदा दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शिवछत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान आयोजित कासा येथे झालेल्या कबड्डी मुली क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलींनी प्रथम क्रमांक यशस्वी प्राप्त करून पुन्हा एकदा आपल्या शाळेचे नाव उंचावले आहे.
आणि म्हणूनच त्याठिकाणी असलेले आदरणीय मा. श्री. भोईर सर, डोल्हारी बुद्रूकचे आदर्श शिक्षक आदरणीय श्री. सुतार सर, मार्गदर्शक कोच श्री. संतोष गणपत उमातोल सर, उपस्थित होते.
तसेच आदरणीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य तथा ठाणे – पालघर जिल्हा सचिव काॅम्रेड मा. श्री. किरण गहला साहेब माजी उपसरपंच एकनाथ हरपाले, यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या शाळेतील मुलींच्या विजयाबद्दल दादडे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. बोंबाडे साहेब, मा. श्री. हडबाळ साहेब, तसेच डोल्हारी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. विलास गहला साहेब, उपसरपंच मा. श्री. महेश खरपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. किसन खरपडे, शाळेचे मुखयाध्यापक मा. श्री. सुरेश कनोजे सर, पदवीधर शिक्षक मा. श्री. भोये सर, श्री. वेखंडे सर, मा. श्री. हिलीम सर, मा. श्री. विष्णु उमतोल सर तसेच ग्रामस्थ व ही शाळा विक्रमगड तालुक्यात येते. म्हणून संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून या प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या मुलींचे गोड कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Total Users : 10829