ji24news

कोणी मुलगी देता का हो मुलगी,भावी नवरदेवाच्या बापाची आर्त हाक!

कोणी मुलगी देता का हो मुलगी,भावी नवरदेवाच्या बापाची आर्त हाक!

:जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड . वर्धा 
सध्या शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळविण्याचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र साखरपुडा, लग्न जमविणे व जमविलेल्या लग्नाचा बार उडविण्याचे काम काही प्रमाणात सुरु आहे. परंतु मुलींचे प्रमाण हजारांच्या मागे सातशे असे झाल्याने ग्रामीण भागातील नवऱदेवाला नवरी मिळेनाशी झाली आहे. काही वर्षापासून मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे; त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे. आता मुलींचे लग्न अठरा ते वीस वर्ष वय होईपर्यत मुली संगणक, शिलाईकाम, ब्यूटीपार्लर असे कोर्स पूर्ण करुन स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार उपलब्ध करत आहेत.
काही मूली तर बीएड,डीएड, डॉक्टर, इंजीनियर,वकील आदी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून त्या नोकरी करतांना दिसतात. तर काही मुलींनी मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत.
मुलींच्या घटत्या जन्मदराने आता हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला! अशी विनवणी करण्याची वेळ मुलावर आली आहे.
एकतर मोठ्या प्रमाणात झालेली भ्रूणहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील विवाहोत्सुक मुलाला लग्न
जमवितांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. यामुळे लग्नाविना राहण्याची वेळ त्या तरुणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबक्या आवाजात आपल्याला हुंडा नको फक्त मुलगी हवी असे मध्यस्थी माणसांना सांगताना दिसत आहे. ग्रामीण भागातील मुलगी सुद्धा लग्नाची घाई न करता शिक्षणाकड़े लक्ष केंद्रीत करतांना दिसत आहे. बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुलींनी नाकारल्याने नापसंत करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकाराची धास्तीच घेतली आहे.
शेतकरी नवरा नको ग बाई!
असे मुली म्हणत आहेत, काही वर्षांपूर्वी मुलं आणि मुली यांच्या संख्येमध्ये तफावत असल्याने वयात आलेल्या तरूणांची लग्ने रखडायची. आता देखील ग्रामीण भागातील तरूणांची लग्न अनिश्चित काळासाठी या कारणामुळे लांबणीवर पडली आहेत. तेव्हा, ग्रामीण भागातील मुलींनी तो सुशिक्षित असला तरी केवळ शेतकरी आहे म्हणून मुलांना नाकारण्याचा हा प्रकार खरंच बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची केवळ एक झलक दाखवणारा आहे.
“गाठली तिसी तरी लग्न जमेना!” दरवर्षी ज्योतिष्यांकडे जाऊन या वर्षी तरी योग आहे का? हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे वर्षानुवर्षे त्यात वय वाढतंच चाललय तिशीला वय पोचलं तरिही आपल्या वयाची मुलगी मिळेना. आणि मुला-मुलीत जास्त अंतर असेल तर लग्न जमेलच कसं असं करत आज प्रत्येक गावात ४० ते ५० नवरदेव बाशिंग घेऊन तयार आहेत पण मुली काही मिळायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.म्हणून लेक वाचवा,लेक शिकवा! अभियान राबविणे आवश्यक आहे,त्याचबरोबर युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शक्य तितक्या लवकर नोकरी मिळविली तर सहज लग्न जमणे सोपे जाईल.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर