
ग्रा.प सदस्या व सामाजिक कार्यकर्ते मुलाचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील मुलांन बरोबर साजरा : शाळेतील मुलांना वह्या वाटप…..
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड : आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण, गरजूंना शिक्षण देऊन करा साजर, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी आपल्या मुलाच्या ध्रुव च्या जन्मदिनी केले आहे. ग्रामपंचायत सदस्य सौ. रत्नप्रभा तुषार पाटील व सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी आपल्या मुलाचा ध्रुव तुषार पाटील याचा वाढदिवस देहर्जे वार्ड क्रमांक 3 या आपल्या मतदारसंघातील जि.प शाळा घाटाळपाडा येथे मुलां सोबत साजरा केला याच शाळेत मुलांना राहुल पाटील यांच्या उपस्थितीत वह्या व साहित्य वाटप करण्यात आल्या. जि.प. शाळेतील मुलांन सोबत ध्रुव याचा केक कापून वाढदिवसा साजरा करण्यात आला. या वेळी सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
तसेच निवडणूकी नंतर येथील ग्रामस्थांना नेहमी शासनाच्या विवीध योजना़ं विषयी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील हे मार्गदर्शन करत असतात. या वेळी तुषार पाटील यांनी बोलतांना सांगितले की वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला एक असा दिवस जो शक्यतो आनंदातच साजरा होतो. कुणी म्हणत आयुष्यातील एक वर्ष कमी होते. मग तो दिवस का साजरा करायचा? पण काही जण म्हणतात आयुष्याचा अनुभव एक वर्षाने वाढला, म्हणुन हा दिवस जल्लोषात साजरा करायचा. पण मी विचार केला, एक आनंदाचा दिवस मिळालाय तो कुणालातरी आनंद देण्यासाठी साजरा करायचा. तुम्हीही आशा प्रकारे वाढदिवस साजरा करा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण… खर तर ही भेट पुरेशी नाही. तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करावासा वाटला तर या अशा शाळांमध्ये शैक्षणिक मदत करुन साजरा करू शकता. शैक्षणिक मदत म्हणजे फक्त वही, पुस्तक, पेन, पेन्सिल वाटप नाही तर इतरही वस्तु ज्याने त्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. कुणी शिक्षण क्षेत्रात असेल विविध उपक्रम, स्पर्धा या शाळांमध्ये आयोजित करुन मुलांना त्यांचे कलागुण पारखण्याची संधी निर्माण करुन देऊ शकतो. एखाद्या शाळेत संगणक, प्रोजेक्टर, स्पिकर सारख्या वस्तु उपलब्ध करुन काळासोबत चालायची संधी या मुलांना निर्माण करुन द्यावी. कुणी अभिनय, डान्स, चित्रकला, हस्तकला आदी कलांमध्ये या नैपुण्य मिळवु देऊ शकेल. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी केले आहे.
Total Users : 10829