
जि. प.शाळा साकुरचे बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश…..
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी
जि. प.शाळा साकुर येथे पार पडलेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि प शाळा साकुर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. संगीत खुर्ची लहान गट मुलामध्ये कु. करण केशव वाढू याने प्रथम क्रमांक पटकावला, 50 मीटर धावणे लहान गट मुलींमध्ये कु. रिया प्रकाश गांगोडे या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच उंच उडी मोठा गट मुलांमध्ये कु. आकाश रामा भगरे याने सुध्दा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हे यश मिळवण्यासाठी साकुर शाळेचे शिक्षक देवराम भोंडवा सर, शिक्षिका मनिषा शिंदे मॅडम, मुख्याध्यापक श्री. बाळू तुंबडा सर, केंद्रप्रमुख महेश भोये सर व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिक्षक अनिल मुकणे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लीला घुटे व इतर सदस्य, माता पालक संघ, ग्रामस्थ साकुर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Total Users : 10829