
प्रादेशिक असमानता कमी करण्यासाठी रोजगाराची निर्मिती आवश्यक- मा.प्रा.दिवाकर गमे….
प्रा.दिनेश राठोड (प्रतिनिधी वर्धा)
प्रादेशिक असमानता कमी करण्यासाठी उद्योगा निर्मिती करणे आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात प्रकल्प उभारल्यास तेथील तरुणांना रोजगार प्राप्त होईल परिणामी त्या भागाचा विकास होण्यास मदत होऊन प्रादेशिक असमानता कमी होण्यास मदत होईल असे विचार वेणा लोक प्रबोधन शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव माननीय प्रा.दिवाकरजी गमे यांनी व्यक्त केले. श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथील अर्थशास्त्र विभाग आणि
विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल: कारणे आणि उपाय योजना’ या ज्वलंत विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाचे उद्घाटन म्हणून विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे हॆ होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध अर्थशास्त्र डॉ.श्रीनिवास खांदेवाले हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांडवलकर, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. निवृत्ती पिस्तुलकर, प्राचार्य संजय धनवटे हॆ होते. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एच. हुद्दा, डॉ.धीरज कदम हे होते. या कार्यक्रमाला या वेणा लोकप्रबोधन शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री अविनाशजी गमे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर, उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमीने यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विठ्ठल घिनमीने यांनी केले तर आभार डॉ. संजय दिवेकरयांनी मानले. विद्यापीठ गीताचे गायन कु.मयूरी डोळसकर, तर स्वागत गीताचे गायन कु. दिव्या अवचट यांनी केले.या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, विद्यार्थी,माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विनोद मुडे, डॉ. गणेश बहादे, डॉ. पंकज मुन, डॉ. नितेश तेलहांडे, प्रा.आरती देशमुख, श्री नरेश कातडे, श्री शंकर कापसे, श्री संजय पर्वत, कु.प्रीती सायंकार, श्री अरुण तीमांडे, अंकुश वैद्य, सुरेश तेलतुमडे, विजया जारोंडे, चेतन साटोने, तृप्ती नदरे, मोनिका उपाते, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले
Total Users : 10829