
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन….
.जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा. दिनेश राठोड:- वर्धा .
स्थानिक वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, उद्घाटक म्हणून वेणा लोक प्रबोधन शिक्षण संस्थेचे संचालक श्री प्रदीप महल्ले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नरेश भोयर, परिक्षक डॉ. विनोद मुडे, डॉ. गणेश बहादे, गुणलेखक डॉ. पंकज मुन तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रवीण कारंजकर, अंतर्गत गुणवत्ता हमी समिती प्रमुख डॉ. संजय दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयीन क्रीडा पटांगणावर करण्यात आले होते, उद्घाटकांनी लाल फित कापून, तसेच नारळ फोडून क्रीडा स्पर्धांचे रीतसर उद्घाटन केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक भवनामध्ये पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विविध खेळांच्या स्पर्धेला सुरवात झाली. त्यामध्ये थाली फेक, गोला फेक, भाला फेक, लांब उडी, १०० मीटर दौड स्पर्धा, कबड्डी व हॉलीबॉल इत्यादी अनेक खेळाचा समावेश होता यात बी. ए. भाग १,२ व ३ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते. खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी अश्या स्पर्धांचे आयोजन केल्या जाते यामध्ये जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे विचार उद्घाटक श्री प्रदीप महल्ले यांनी व्यक्त केले. तसेच आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदूढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागलीं आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो असे विचार अध्यक्षीय भाषणात डॉ. सारिका चौधरी यांनी मांडले. संपूर्ण स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्था- अध्यक्ष सौ. हेमलता गमे, संस्था – सचिव प्रा. दिवाकर गमे, संस्था – सहसचिव अविनाश गमे, प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पदक मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले.
मैदानी स्पर्धेत विजेता १०० मीटर दौड स्पर्धा मुली प्रथम – कु. स्नेहल कामटकर, मुले – प्रथम विजय शेंडे; गोळा फेक मुली प्रथम – कु. राधिका गोटेफोडे, मुले प्रथम – मयूर झाडे; थाळी फेक मुली प्रथम – कु. वैष्णवी खोडे, मुले प्रथम – अभय खोडे; लांब उडी मुली प्रथम- कु. दर्शना शिवरकर, मुले प्रथम – सचिन कोळसे; भाला फेक मुली प्रथम – कु. राधिका गोटेफोडे, मुले प्रथम तुषार वाटमोडे यांनी बक्षिस मिळविले तर सांघिक खेळामध्ये विजेता मुलींचा कबड्डी संघ बी. ए. भाग १ – प्रांजली नेटे, सिमा खंडाळकर, राधिका गोटेफोडे, स्नेहल कामटकर, स्वाती सुपारे, चित्रा टिटवे, राजश्री सुर्यवंशी; विजेता मुलांचा कबड्डी संघ बी. ए. भाग १ – प्रज्वल वासके, अभय पोहाणे, तुषार वाटमोडे, समीर गुरनुले, रोशन वाडेकर, यश वाघमारे, विलास चौधरी; विजेता मुलींचा हॉलीबॉल संघ बी. ए. भाग २ – दर्शना शिवरकर, रक्षा वाटे, वैष्णवी खोडे, हेमलता तिजारे, पुनम धाडवे, दिव्याभारती अवचट, रुचिता वेले; विजेता मुलांचा हॉलीबॉल संघ बी. ए. भाग ३ – विजय बावणे, विजय शेंडे, सूरज मडावी, पाक्षिक धुर्वे, महेश इंगळे, लक्ष्मण सावनकर, सचिन कोळसे, गणेश खिरटकर, चेतन दाते, मयूर झाडे. हे संघ विजयी ठरले. क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. विठ्ठल घिनमिने, प्रा. आरती देशमुख, डॉ. नितेश तेलहांडे, श्री. नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्बत, अंकुश वैद्य, सुरेश तेलतुंबडे, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे यांनी विशेष मदत व सहकार्य केले .
खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.- प्रदीप महल्ले
निकोप शरीरातच निकोप मन असू शकते. – डॉ. सारिका चौधरी
थाली फेक, गोला फेक, भाला फेक, लांब उडी, १०० मीटर दौड स्पर्धा, कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन.

Total Users : 10828