ji24news

कॉपी बहादरांना कसे रोखायचे ? नवीन नवीन कल्पना सुचवा ; उत्कृष्ट आयडिया सुचवणाऱ्यांचा होणार यथोचित सत्कार….

कॉपी बहादरांना कसे रोखायचे ? नवीन नवीन कल्पना सुचवा ; उत्कृष्ट आयडिया सुचवणाऱ्यांचा होणार यथोचित सत्कार….

जोहार इंडिया 24 न्यूज…

दहावी, बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणे ही बोर्डासमोरील मोठी डोकेदुखी आहे. ग्रामीण भागात दरवर्षी परीक्षेदरम्यान कॉपीची शेकडो प्रकरणे उघडकीस येतात. विविध उपाययोजना करूनही बोर्डाला कॉपी प्रकरणाला आळा घालण्यास पूर्णतः यश आलेले नाही.
त्यामुळे आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह समाजातील विविध घटकांना कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी नवनवीन कल्पना सुचविण्याचे आवाहन केले आहे. येणाऱया प्रत्येक कल्पनेचे मूल्यमापन करून यांपैकी दहा उत्कृष्ट कल्पना पाठविणाऱयांचा बोर्डाच्यावतीने यथोचित सत्कारही करण्यात येणार आहे.
राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळात कॉपी प्रकार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जातात. या प्रयत्नात एकसूत्रीपणा आणण्यासाठी संपूर्ण राज्यात एक नियोजनबद्ध व सर्वसमावेशक कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी कॉपी कशी रोखायची यासाठी उपाय सुचविण्याचे आवाहन बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी बोर्डाने एक गुगल फॉर्म तयार केला असून 20 जानेवारीपर्यंत इच्छुकांनी हा फॉर्म भरून पाठवायचा आहे, असे राज्य शिक्षण मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर