
खोस्ते (खोस्ते महसूल) प्रीमियर लीग 2023 मोठ्या जल्लोषोत साजरा……
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये.
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील खोस्ते प्रीमियर लीग(KPL) अतिशय आनंदात, उत्साहात पार पाडल्या गेल्या. (खोस्ते महसूल गाव ) वाणीपाडा, चिंचपाडा, पाटीलपाडा व भोयेपाडा अशा चार गावचे अनेक खेळाडू एकत्र येऊन 11 जानेवारी 15 जानेवारी 2023 या पाच दिवसांमध्ये अतिशय चुरशीची व अटीतटीचे क्रिकेटचे सामने नियोजन पद्धतीने खेळलेले गेले. अनेक देगणी दात्यांनी या क्रिकेटच्या सामन्यांना आकर्षक बक्षीसे व अर्थसाह्य देखील केले. तसेच अनेक घटकांनी या खेळाडूंना विविध मार्गाने मदत केली. या चार दिवसांमध्ये प्रमुख पाहुणे तसेच माननीय संजय वाघ (ग्रामसेवक) साहेब, मा. सौ. नीलम भास्कर भोये (सरपंच मॅडम), ग्रामपंचायत सदस्य कैलास माळगावी व प्रदीप भोये, विजय गावित सर, दिनेश मेजर , नरेश भोये सर अशा अनेक मान्यवरांनी या लीगला भेट दिली. बक्षीस वितरनासाठी विक्रमगड तालुक्याचे सभापती यशवंत कनोजा सर, त्यांचे सहकारी व चार गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच गावातले सन्माननिय व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अनेक खेळाडूंना बक्षीस वितरण करून सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारे संघ म्हणजे- प्रथम क्रमांक- दक्ष इलेव्हन, व्दितीय क्रमांक-AAA , तृतीय क्रमांक- गावदेवी वॉरियर्स,
चतुर्थ क्रमांक- खांजोडे ब्रदर्स यांना मिळाले.
बक्षीस समारोपामध्ये सन्माननीय श्री.यशवंत कनोजा सर (सभापती ) यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे माननीय श्री. यशवंत कनोजा सर (सभापती,पंचायत समिती विक्रमगड), जगन खांजोडे मेजर, योगेश अवतार मेजर, अजय भोये एसटीआय, नितेश भोये (तंटामुक्तीअध्यक्ष) गावातील इतर प्रमुख मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वळवी सरांनी केले. सर्व पाहुणे मंडळींचे व सर्व देणगी दात्यांचे, तसेच खेळायला मदत केलेल्या सर्व घटकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Total Users : 10828