
ग्रामीण भागातील बेरोजगारांना नौकरीची संधी…कौशल्य आणि आदिवासी विकास विभागाचा ऊपक्रम.
जोहार इंडिया न्यूज 24 प्रतिनिधी ( मोखाडा.)
जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील बेरोजगार तरुण – तरुणींना विविध कंपन्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची सुवर्णसंधी ऊपलब्ध झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी 17 जानेवारी ला जव्हार च्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व कागदपत्रांसह ऊपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाने केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आयटीआय ) जव्हार येथे विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. या कंपण्यांमध्ये 3 हजार 715 रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली आहे. सदरचा ऊपक्रम आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह, जिल्हा कौशल्य व रोजगार विभाग, पालघर व ठाणे जिल्हा सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, पालघर व ठाणे जिल्हा महेश कुमार सिडम, जव्हार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्याम अंबाळकर, आणि वाडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी संयुक्त राबविण्याचे नियोजन केले आहे.

Total Users : 10828