
चेतन ठाकरे सर ” महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
ब्लु स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्थेमार्फत आज पंढरपूर, जि.सोलापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना यावर्षीचा “महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सन्मा श्री महादेव भालेराव नगराध्यक्ष नगरपरिषद पंढरपूर, श्री. महादेव धोत्रे नगरसेवक पंढरपूर, संस्थेचे अध्यक्ष श्री.चंदन बनसोडे सर ,श्री.निलेश हांडे , दीप्ती हांडे आदी मान्यवर उपस्थित होते. चेतन ठाकरे सरांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चेतन सरांचे विद्यार्थीभिमुक,विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.आतापर्यंत सर्वात कमी वयामध्ये हा पुरस्कार मिळविण्याचा मान चेतन सरांना प्राप्त झाला.म्हणून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Total Users : 10828