ji24news

अन्वी (परी) मिलिंद चौधरी हिच्या ५व्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप..

अन्वी (परी) मिलिंद चौधरी हिच्या ५व्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) :सौरभ कामडी
अन्वी माही मिलिंद चौधरी हिच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त आपले मानवाधिकार फाउंडेशन व सोशल मिशन सोसायटीच्या माध्यमातून आणि वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडा यांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्यानिमित्त जाणाऱ्या वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप ढोलेवाडी, ता.त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सकाळपासून आयोजित करण्यात आले होते.
‘याची देही, याची डोळा’ या संत शिकवणीतून जीवनाचे सार्थक करण्याची कला माही चौधरी यांनी आपल्या मुलीवर रुजवली आहे. संत संगत, संतांची सेवा, संतांची शिकवण हेच जीवनाचे अमृत आहे, असे परीच्या मनावर ठामपणे रुजवावे या हेतूने वाढदिवसाचे औचित्य साधत आज रोजी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील पायी वारी करत जाणाऱ्या सर्व वारकरी भक्तांची सेवा करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही जिल्ह्यातून जवळपास 50 दिंडी आणि हजारो वारकरी या दिंडी मध्ये सहभागी होऊन 150 ते 200 किमी चा घाट असलेला प्रवास पायी करत असतात. ऊन, वारा, थंडी यांचा सामना जंगली भागातून करत असताना वारकऱ्यांना असंख्य आरोग्याच्या अडचणींवर मात करावी लागते. याकरिता आपले मानवाधिकार फाउंडेशन व सोशल मिशन सोसायटीच्या माध्यमातून आणि वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडा यांच्या विशेष सहकार्याने शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी परिसरात असणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वही, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संविधान व्याख्याते डॉ.दिपेश पष्टे, भारतीय कामगार सेनेचे मिलिंद चौधरी, आपले मानवाधिकार चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेश पष्टे, राज्य अध्यक्ष गणेश उमराठकर, मोखाडा तालुका अध्यक्ष भाऊ वैजल, माही चौधरी, कल्पेश पष्टे, वाडा हॉस्पिटल चे डॉ.अमित शर्मा आणि सहकारी, शाळेतील शिक्षक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि दिंडी आयोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर