
पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांचे नवीन पुलाचे जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – जव्हार तालुक्यातील धडाडीचे व्यक्ती वकृत्व असणारे पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे साहेब ( पत्रकार) हे साहेब अनेक अडचणींना सामोरे जातात आणि त्या अडचणी सोडवून घेण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्याच प्रकारे जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कोलाळे हददीतील ता. जव्हार अंतर्गत फणसपाडा भवरदाचापाडा ते मोक्याचा पा डा या रस्त्याचे डांबरीकरण काम होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच भावरदाचापाडा शेजारी नदीवरील पुल येत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीला पूर येत असून, तेथील स्थानिक ग्रामस्थ, शिक्षणासाठी, शेतीच्या कामासाठी, रोजगारासाठी, आरोग्याच्या दृष्टीने, पर्यायी रस्ता नसून नदीवरील पुल अतिशय लहान आणि साठ (६०) वर्षे जुना पुल असून पाण्याखाली जात असतो त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि म्हणून तेथील स्थानिक ग्रामस्थ लोकांची खूप गंभीर दयनीय अवस्था होत आहे.
म्हणून वरील माहिती नुसार पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे साहेब यांनी पालघर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य मंत्री दर्जाचे असणारे मा. श्री. प्रकाश जी निकम साहेब यांना निवेदन देण्यात आले.
आणि वरील विषयाला अनुसरून तेथील स्थानिक ग्रामस्थ लोकांनी रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे कामास मंजुरी देऊन आम्हा ग्रामस्थांची समस्या दूर करावी असी मागणी करून विनंती केली.
Total Users : 10829