ji24news

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत मल्टी स्किल टूल एक्जीबिशनचे आयोजन…

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत मल्टी स्किल टूल एक्जीबिशनचे आयोजन…

जोहार इंडिया न्यूज 24 प्रा.दिनेश राठोड (वर्धा-जिल्हा प्रतिनिधी)
वर्धा नजीकच्या वडणेर येथिल इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत ‘मल्टी स्किल टूल एक्जीबिशनचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रथम युथ नेट प्रोग्रामच्या मेंटॉर यांनी युवकांना विद्यार्थ्यांना करिअर बद्दल मार्गदर्शन केले आपला देश स्किलिंग च्या बाबतीत फारच मागे आहे आपला देश स्किल कडे वळावं याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रोग्रामच्या माध्यमातून वयोगट 18 ते 35 या बेरोजगार विद्यार्थ्यांना युथ नेट प्रोग्रामच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण व सोबतच रोजगार पण दिला जातो त्यात त्यांना जेवण व राहण्याची व्यवस्था पण मोफत असते
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांचे 13 व्होकेशनल कोर्स आहे जसे की हॉटेल मॅनेजमेंट सेक्टर मध्ये हाऊस कीपिंग , फूड अँड बेवरेज सर्विस आणि फूड प्रॉडक्शन, ऑटोमोटिव्ह फोर व्हीलर मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह टू व्हीलर मेकॅनिकल, हेल्थ केअर ,ब्युटीशियन, हॅलो पिरेड, बारबेंडी, मिशन ,फार्म वर्क ,इलेक्ट्रिशन ,वेल्डिंग, प्लंबिंग इत्यादी त्यांचे कोर्स आहेत या कोर्सचे प्रथम मल्टी स्किल ट्रेनिंग सेंटर राळेगाव येथे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना मोफत प्रशिक्षण देऊन गरजू विद्यार्थ्यांना रोजगार दिला जातो व लाइफ स्कील मध्ये सतरा अठरा कोर्सेस आहे जे विद्यार्थ्यांना घरबसल्या करता येते
त्यातच युथ नेट प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात जसे की सायन्स ऍक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी क्लब ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्हिटीज 10 ते 18 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात
या एक्झिबिशनमध्ये प्राचार्य भगत मॅडम,प्रा.मोगरे मॅडम,प्रा.राठोड प्रा.कडू मॅडम सर,प्रा.ढाले सर,प्रा.इंगळे सर,प्रा.दौलतकर सर व इतर शिक्षक वृंदांचा व विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद दिसला यावेळेस मार्गदर्शन करताना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन युथ नेट प्रोग्राम चे मेंटर महिंद्रा धुर्वे व मयूर वटाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना वरीलपैकी एखादा कोर्स करायचे असेल तर 7721039458 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर