
पालघर जिल्ह्यातील अथलेटिक्स ग्रुप पालघरचे बॉम्बे वाय. एम. सी. ए. च्या 45 व्या राज्य पातळीच्या अथलेटिक मीट स्पर्धेत सुयश…
जोहार इंडिया 24 न्यूज पालघर प्रतिनिधी
मरीन लाईन्स ( मुंबई ) येथे नुकत्याच बॉम्बे वाय. एम. सी. ए. च्या 45 व्या ॲथलेटिक मीट स्पर्धा मरीन लाईन्स ( मुंबई ) येथे पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून धावण्याच्या अनेक क्रीडाप्रकारात जवळपास हजारो धावपट्टूंनी सहभाग नोंदवला होता. या ॲथलेटिक स्पर्धेत ॲथलेटिक ग्रुप पालघरने पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना कु.रुद्र गणेश किणी याने 14 वर्षे वयोगटात 600 व 100 मीटर्सच्या रेसमध्ये गोल्ड मेडल व सिल्वर मेडल,गौरव सांगळे याने 17 वर्षे वयोगटात 600 मिटर्स गोल्ड मेडल व 100 सिल्वर मेडल तर मुलींमध्ये 17 वर्षे वयोगटात कु.वैद्यही कुडू हिने गोल्ड मेडल,14 वर्षे वयोगटात कु.सारवी उपेंद्र मोरे 600 मिटर्स रेसमध्ये सिल्वर मेडल तर कु.तनुश्री विष्णु गाडर ( 10 वर्षे ) हिने 12 वर्षे वयोगटात 300 मिटर आणि 100 मिटरच्या रेसमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल्स मिळवले आहेत.
हे सर्व धावपट्टू ॲथलेटिक्स ग्रुप – पालघरच्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स – स्नेहल राजपूत मॅडम यांच्या तालमीत ॲथलेटिक्सचे धडे गिरवत आहेत प्रशिक्षक स्नेहल राजपूत मॅडम या खेळाडूंकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता त्या पालघरमध्ये ॲथलेटिक्स ग्रुप – पालघरच्या माध्यमातून जवळपास 150 ॲथलेटिक्सना ॲथलेटिक घडवण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत. हे खेळाडू अनेक स्पर्धांच्या माध्यमातून स्नेहल राजपूत मॅडम यांच्या ग्रुपचे नाव उज्वल करत आहेत.

Total Users : 10829