
पालघर जिल्ह्याच्या तनुश्री गाडर हिने बॉम्बे वाय. एम. सी. ए. च्या 45 व्या राज्य पातळीच्या अथलेटिक मीट स्पर्धेत मिळवले ब्रॉन्झ मेडल्स…
जोहार इंडिया 24 न्यूज पालघर प्रतिनिधी
मरीन लाईन्स ( मुंबई ) येथे नुकत्याच बॉम्बे वाय. एम. सी. ए. च्या 45 व्या ॲथलेटिक मीट स्पर्धा मरीन लाईन्स ( मुंबई ) येथे पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून जवळपास 900 धावपट्टूंनी सहभाग नोंदवला होता. या ॲथलेटिक स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दमदार प्रदर्शन करून मोखाडा तालुक्यातील घानवळच्या कु.तनुश्री विष्णु गाडर ( 10 वर्षे ) हिने 12 वर्षे वयोगटात 300 मिटर आणि 100 मिटरच्या रेसमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल्स मिळवले आहेत.
कु.तनुश्री विष्णु गाडर ही पालघर येथे ॲथलेटिक्स ग्रुप – पालघरच्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स – स्नेहल राजपूत मॅडम यांच्या तालमीत ॲथलेटिक्सचे धडे गिरवत आहे. तनुश्रीच्या या कामगिरीने पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Users : 10828